आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ

सावदा , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व समाजात एकता व सलोख्याचे वातवरण निर्मितीसाठी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने खिरोदा येथे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

 

सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सावदा शहर, डी.एन.कॉलेज, चिनावल व खिरोदा येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेदरम्यान खिरोदा बी.एड. कॉलेज येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय देविदास इंगोले तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content