जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्थेबाबत आ. राजूमामा भोळे यांनी विधानसभेत आवाज उठवत शहरातील रस्ते विकासासाठी राज्य शासनाने भरघोस निधी द्यावा अशी केली.
शहरातील रस्त्यांची कामे त्वरित होण्यासाठी व शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा, असा प्रश्न आज विधानसभा पावसाळी अधिवेशनात आ. राजूमामा भोळे यांनी उपस्थित केला. आज दि. २५ ऑगस्ट, रोजी पावसाळी अधिवेशनात आमदार राजुमामा भोळे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून शहरवासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविणेसाठी रस्ते विकासासाठी भरगोस निधी द्यावा, तसेच या पूर्वी मागणी केलेल्या एकूण १३० कोटी निधीची मागणी मंजूर करण्यात यावी. मागील काळात मंजूर १०० कोटी निधी पैकी उर्वरित ५८ कोटी निधी लवकरात लवकर मिळावा.
त्याचबरोबर जळगाव शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा व नवीन उद्योगांना चालना मिळण्यासाठी शहरात नवीन MIDC टाऊनशिप करिता मंजुरी द्यावी. जळगाव शहरातील महत्वाच्या समस्या सोडविणे बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक आयोजित करावी, असा प्रश्न उपस्थित केला.