जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार राजूमामा भोळे यांनी दिवाळीनिमित्त शहरातील गरीब वस्तीत फराळासह कपड्यांचे वाटप केले.
तंट्या भील सोसायटी येथील गरीब बांधवांना दिवाळी निमित्त फराळ व कपडे वाटप सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमदार राजू मामा भोळे यांच्यावतीने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने करण्यात आले.
तंट्या भिल सोसायटी येथील गरीब बांधवांसह भगिनींना फराळ तसेच साडी-चोळी आणि कपडे देऊन त्यांची दिवाळी साजरी केली केली. याप्रसंगी लहान मुलांच्या चेहरा स्मितहास्याने फुलून गेला. तेथील महिला भगिनींनी आमदार राजूमामा यांचे तोंड भरून कौतुक केले. आमच्या हक्काचा मामा गेल्या दहा-बारा वर्षांपासून मुलांची दिवाळी साजरी करायला येतात हे आम्हाला फार आनंद वाटतो असे त्यांनी भावपूर्ण उदगार या प्रसंगी काढले.
या कार्यक्रमाला आमदार भोळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात माजी महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई निंभोरे, सरोज पाठक, महेश चौधरी, विनोद मराठे, अतुल बारी, विठ्ठल पाटील, गजानन वंजारी, किशोर वाघ आदींचा समावेश होता.