आ. पाटील यांच्याहस्ते परदेशी जाणाऱ्या युवकांसाठी लसीकरण केंद्राचे उद्घाटन

पाचोरा, प्रतिनिधी  । परदेशात  शिक्षण व नोकरीनिमित्त जाणाऱ्या १८ वर्षांवरील युवकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस लसीकरण केंद्राचे उद्घाटन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात  लसीकरण केंद्रास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी  युवा नेते सुमित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित साळुंखे, आरोग्य विस्तार अधिकारी किरणकांत जोगी, आरोग्य सहाय्यक आकाश ठाकूर, दिपक दिक्षीत, राजेंद्र पाटील, जगन्नाथ पाटील, चंद्रकांत पाटील, आरोग्य सेविका भारती पाटील, ज्योस्त्ना पाटील, पूजा जगताप, माधुरी पाटील, मिना देशमुख, उपस्थित होते. लसीकरणाचे काम भारती पाटील यांनी केले. पाचोरा येथील शिद्धांत पाटील (सिंगापूर), यशराज गुढेकर (यु. एस. ए. ) तर यशवंत संजय पाटील (भडगाव), सौरभ पाटील, स्वप्निल पाटील, राहुल जाधव व हर्षद पाटील यांना रशिया या देशात एम.बी.बी.एससाठी जावयाचे असल्याने त्यांनी लसीकरण करून घेतले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक व आभार डॉ. समाधान वाघ यांनी केले. तर आमदार किशोर पाटील यांनी या लसीकरण मोहीमेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

 

 

Protected Content