आ. किशोर पाटील यांनी पाचोरा तालुक्याची आमसभा घ्यावी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील तीन वर्षांपासून तालुक्यात आमसभा घेण्यात आलेली नसून आ. किशोर पाटील यांनी ही सभा तालुक्यात घ्यावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष  विकास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रातून दिले आहे.

 

 

महाराष्ट्र विधानसभेला जवळपास तीन वर्ष पूर्ण होत आली असून पाचोरा – भडगाव मतदार संघाला सुद्धा तीन वर्ष पूर्ण होत आली आहेत. परंतु तालुक्याचे शहरी तसेच ग्रामीण प्रश्न जे महत्वाच्या असलेल्या आमसभेत सुटतात. किंबहुना सर्व विभागाचे प्रश्न आणि उत्तरे आमसभेच्या माध्यमातून समर्पक पद्धतीने मिळतात. जसे शहरी व ग्रामीण भाग, नगरपालिका, रुग्णालय, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, जि. प. बांधकाम विभाग, तहसिल, प्रांत कार्यालय, सिटी सर्व्हे, वन विभाग, आरोग्य विभाग, विज वितरण कंपनी या सारख्या विभागा संबंधित तालुक्यातील व मतदासंघांतील जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडता येतात. व सोडवता सुद्धा येतात. आमसभेस जनतेच्या दृष्टिकोनातून एक वेगळेच महत्व व योग्य माध्यम आहे. तसेच योग्य प्रश्न मांडण्याचे ठिकाण म्हणून त्या सभेकडे बघण्यात येते. परंतु, गेल्या तीन वर्षापासून सर्व मतदारसंघातील जनता या महत्वाच्या सभेपासून वंचित राहिली असून जनतेच्या हक्काच्या व अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या महत्वाच्या सभेपासून जनतेला वंचित ठेऊ नये. त्यांनी त्वरित आमसभा घ्यावी. सभेपूर्वी त्याचा योग्य प्रचार, प्रसार करावा. जेणेकरून जनतेला त्यांचे महत्वाचे प्रश्न मांडता येतील. व ते आमसभे मार्फत आपल्या माध्यमातून सोडवता येतील. नागरिकांच्य व शेतकऱ्यांच्या समस्या बघता आ. किशोर पाटील यांनी लवकरात लवकर आमसभा आयोजित करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

 

Protected Content