पाचोरा प्रतिनिधी । आज पाचोर्यात कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर आमदार रोहीत पवार यांनी आ. किशोरआप्पा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
आज रोहीत पवार हे भडगाव, पाचोरा व जळगावातील विविध कार्यक्रमानिमित्त आले आहेत. या अनुषंगाने दुपारी पाचोर्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार मनीष जैन आदींची उपस्थिती होती. आमदार किशोर पाटील यांनी रोहीत पवार यांचे स्वागत केले.