चोपडा, प्रतिनिधी । येथील यशोधन चरिटेबल ट्रस्ट संचलीत आॅर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालकसभेत कोरोन योद्धे पालकांचा सत्कार करण्यात आला.
आॅर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या पालकसभेस सरस्वती विद्यालय, मुंबईचे मुख्याध्यापक मुकुंद पाटील. व्ही. के. पाटील, नंदुरबार व संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सभेत कोरोना कालावधीत जे पालक डॉक्टर्स, परिचारिका पॅथाॅलाॅजिस्ट,केमिस्ट अँड ड्रगीस्ट यांनी जनसामान्यांची सेवा केली अशा पालकांचा कोरोना योध्दा म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना लॉक डाऊन कालावधीत ज्या पालकांनी धडपड करुन विद्यार्थ्यांना दिलेले गृहकार्य पुर्ण करून शाळेत येवून जमा केले अशा पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी केला. शाळेतर्फे ऑनलाईन व ऑफ लाईन पध्दतीने घेतल्या गेलेल्या विविध उपक्रमांची माहिती व त्यांची क्षणचित्रे शाळेचे मुख्याध्यापक उमेश महाजन यांनी स्लाईड शोद्वारे दिली. सभेस पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नितेश वाघ व दिपाली पाटिल यांनी केले. यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, समन्वयक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.