Home Cities जळगाव आसोदा येथे सार्वजनिक विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

आसोदा येथे सार्वजनिक विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी


dharangaon news 4

आसोदा, प्रतिनिधी | येथील सार्वजनिक विदयालयात आज (दि.३०) राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला शाळेचे पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

 

यावेळी विचार मंचावर मुख्याध्यापिका विद्या खाचणे, डी.जी. महाजन उपस्थित होते. कार्यक्रमात अस्मिता चौधरी, भाग्यश्री नारखेडे, मोहिनी महाजन या विद्यार्थिनींनी महात्मा गांधीजींच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन चारूलता टोके यांनी केले तर आभार पी.जे. बह्राटे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले..


Protected Content

Play sound