पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आसनखेडा ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच निवड नुकतीच ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांच्यासह उपस्थित सदस्यांच्या मध्ये निवड करण्यात आली.
आसनखेडा तालुका पाचोरा या ग्रामपंचायतीचे जानेवारी २०२१ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. ग्रामपंचायतच्या नऊ जागांपैकी आबा अंकुश पाटील यांच्या एकता पॅनलच्या सहा जागा निवडून येऊनही सरपंचपदी उषाबाई रवींद्र पाटील हे प्रबळ दावेदार असताना यावेळी सरपंचपदासाठी त्यांच्याच पॅनल मधून इंदिराबाई बबन पाटील हे विरोधी पॅनलमध्ये सामील होऊन त्यांच्याबरोबर धनराज मोरे या सदस्याला सोबत घेऊन इंदिराबाई पाटील हे सरपंच पदावर विराजमान झाल्या. सोबत उपसरपंच म्हणून कल्पेश पाटील यांची निवड करण्यात आली.
या दोघांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कामे केली असल्याची तक्रार गावातील निलेश शिवाजी पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार देऊन संबंधितांची चौकशी करून अपात्र करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या केलेल्या चौकशीत सरपंच उपसरपंच यांच्यासह दोन सदस्य असे एकूण ४ जण दोषी आढळल्याने आसनखेडा ग्रामपंचायतचे ४ सदस्य हे अपात्र करण्यात आले. आसनखेडा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत एकता पॅनलचे निवडून आलेले सदस्य उषाबाई रवींद्र पाटील, अशोक देवराम पाटील, वैशाली आबा पाटील, पूजा अमोल गायकवाड व भुराजी तुकाराम सोनवणे या पाच सदस्यांमध्ये सरपंच निवड ११ मे रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पगार तलाठी नदीम शेख ग्रामसेवक नंदू पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी सरपंच पदासाठी उषाबाई रवींद्र पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंच पदी अशोक देवराम पाटील यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. यावेळी सयाजी पाटील , कायदेतज्ञ अॅड. राहुल सुभाष पाटील, नवल पाटील, पांडुरंग पाटील, रमेश पाटील, भागवत पाटील, नवल चुडामन पाटील ग्रामसेवक व आसनखेडा ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.