गुवाहाटी-वृत्तसंस्था | शिवसेनेचे आशीष जैस्वाल यांच्यासह चार आमदार आज शिंदे गटाला जाऊन मिळाले असून त्यांच्या सोबत माजी मंत्री दीपक केसरकर यांनी देखील त्यांची साथ घेतली आहे.
काल रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय बंगल्यावरून मातोश्रीवर प्रयाण केल्यानंतर मोठ्या घडामोडी झाल्या. त्यांना हजारो शिवसैनिकांचे समर्थन लाभले असले तरी शिंदे यांच्या समर्थकांची संख्या देखील वाढीस लागली आहे. माजी मंत्री दीपक केसरकर हे शिंदे यांच्याकडे निघाले आहेत. यासोबत आशीष जैस्वाल यांच्यासह चार आमदार हे देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत.