आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाविरूद्धच्या लढ्यात पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या आशा सेविकांना ठाकरे सरकारने अखेर दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा सेविकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 12 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार आशा सेविकांच्या मानधनात दरमहा २०००, तर आशा गटप्रर्तकांना मानधनात दरमहा ३००० अशी वाढ करण्यात आली आहे. आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तशी तरतूदही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या ७१ हजार आशा सेविका कार्यरत आहेत. आजच्या कॅबिनेट बैठकीत कोविड उपाय योजना संदर्भात आढावा बैठक झाली. पिक विमा योजने संदर्भात बैठक झाली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पिक विम्याचा फायदा मिळाला पाहिजे. पर्यटना संदर्भात रायगड, रत्नागिरी, सिधुदूर्ग जिल्ह्यात स्थानिक लोकांच्या सहभागातून पर्यटन व्यवसाय निर्माण केले जातील. आशा सेविकांचा मोबदला वाढवण्यात आला आहे. 1 जुलैपासून आशासेविकांना मानधनात 2 हजार रुपयांची 3 हजार रुपये वाढीव वेतन मिळणार आहे.

 

आज मंगळवार दि 25 जून मंत्रिमंडळ बैठक: संक्षिप्त निर्णय

 

1.महाराष्ट्र राज्य व्यवसाय,व्यापार,आजिविका व नोक-या यावरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यावरील कर(सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.

 

2.महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (व्दितीय सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.

 

3.रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता. फलोत्पादन शेतकऱ्यांना होणार लाभ.

 

4.हंगाम २०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे शेतक-यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता.

 

5.माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण – २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत देण्यात आली मुदतवाढ.

 

6.कोविड-१९ च्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी.

 

7.राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजुरी.समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार.

 

8.नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता.

 

9.आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ.राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा.

 

10. एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करणार

 

11 गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना

 

12. कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी करार मान्यता.

Protected Content