आशा व गटप्रवर्तक यांचा २८ सप्टेंबरपासूनचा तीन दिवसीय संप स्थगित (व्हिडीओ)

चोपडा तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन सादर

चोपडा प्रतिनिधी । मुलभूत बाबींची जाणीव करून देण्यासाठी येत्या २८ सप्टेंबर २०२० पासून सलग तीन दिवस राज्यव्यापी संपाची हाक राज्यातील आशा व गटप्रवर्तक संघटनांच्या कृती समीतीने दिली होती पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हाट्सअपपत्र विनंतीनुसार सदर संप स्थगित करण्यात आला असून जर मागण्या मान्य न झाल्यास येत्या १३ ऑक्टोबरपासून पुन्हा संप पुकारण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर यांना देण्यात आले आहे.

संपाच्या तयारीसाठी चोपडा येथे महात्मा फुले नगरमध्ये आशा स्वयंसेवकांची मीटिंग घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष अमृत महाजन यांनी आशा गटप्रवर्तकांसाठी महाराष्ट्र राज्यात व जळगाव जिल्ह्यात कोरोना महामारी काळात केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. शेवटी २० मागण्यांचे निवेदन तयार करण्यात आले असून त्यात म्हटले आहे की “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमाअंतर्गत नेमलेल्या पथकात गैरहजर राहणारे किंवा सहभाग न देणारे सभासद यांचे ऐवजी पर्यायी महिला पुरुष स्वयंसेवक त्वरित नेमावे.तसेच या पथकात सहभागी कोरोना योद्ध्यांना एन-95 मास्क, हात मोजे, पीपीई कीट, सॅनिटायझर, साबण व संरक्षक साधने द्या. लागणारी स्टेशनरी व छापील फॉर्म पुरवावेत. मोबाईल उपलब्ध न झाल्यास ऑनलाइन न करता लेखी स्वरूपामध्ये नोंदी घ्याव्यात. आशावर्कर गटप्रवर्तकांना आरोग्य खात्यात कायम करा. दरदिनी साडेतीनशे रुपये मोबदला द्यावा. आरोग्य खात्यातील रिक्त जागा व अतिरिक्त आशाची भरती करावी आशांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी द्यावी.त्यांच्या कामाचे आठ तास त्यात एक तास सुट्टी टाकून कामाचा दिवस ठरवावा.नवीन आशांचे ट्रेनिंग घ्यावे नगरपालिका ग्रामपंचायततर्फे थकीत प्रोत्साहन भत्ता मिळावा. आशांना सन्मानजनक वागणुक मिळावी. आशांवरील हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आशांना आरोग्य विमाअंतर्गत 50 लाखाचे कवच 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवावे. भुसावळ तालुक्यातील खडकाच्या मयत आशा सायराबी अन्वर शेख यांच्या वारसाना 50 लाख रुपये विमा कवच लाभ द्यावा, आशां गटप्रवर्तकांना जाहीर केलेली मानधन वाढ मिळावी आदी मागण्यांसाठी 13 ऑक्टोबर पासून 3 दिवसाचा संप करण्यात येणार आहे, असा इशारा देणारे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांना देण्यात आले.

यावेळी मिनाक्षी सोनवणे, योगिता बाविस्कर, पल्लवी सोनवणे, ज्योती सोनवणे, शीला सपकाळे, संजना वसावे, आरती कापुरे, पुनम सोनवणे, सविता ओली, सुवर्णा माळी, दिपाली बावा, मंगला निकुंभे, मनिषा बारेला, नूतन पाटील, रोहिणी देशमुख, वर्षा धनगर, दिक्षा शिंदे, वैशाली चौधरी, हिना पिंजारी, तन्जीम गणी, गायत्री जोशी यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

https://www.facebook.com/508992935887325/videos/769164493930859

Protected Content