आशा वर्कर्स यांना मानसिक त्रास देणाऱ्या आरोग्य सेविकेवर कारवाई करा

 

बोदवड, प्रतिनिधी । येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका आशा वर्कर यांना मानसिक त्रास देत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बोदवड येथील आशा वर्कर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी व तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, आरोग्यसेविका खडसे यांच्या कार्य क्षेत्रात काम करणाऱ्या १२ आशा वर्कर्स यांना खडसे मानसिक त्रास देत आहेत. त्या आशा वर्कर्स यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम करत असून आशा वर्कर्स यांना मानसिक त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यात
खडसे या आशांना तुम्हाला इंग्रजी येते का ? कम्प्युटर चालवले जाते का ? तुम्ही कामात कमी पडत आहात ? लाभार्थ्यांपर्यंत तुमचे काम पोहोचत नाही. कुणाचे बाळ पोटात वाढले तर त्याचा संबंध आशा वर्कर यांच्याशी येतो. तुम्हाला काय बोलावे माझ्याकडे शब्दच नाहीत अशाप्रकारे खडसे या आशां वर्कर्स यांना मानसिक त्रास देत आहेत. अपशब्द बोलत आहेत. हा सर्व त्रास सहन करून देखील खडसे यांचे सर्व रजिस्टर जन्म मृत्यू नोंदी यासारखी कामे अशा वर्कर्स करतात. त्यामुळे आशा वर्कर खडसे यांच्या त्रासाला कंटाळले आहेत. खडसे यांना वरिष्ठ स्तरावरून योग्य ती समज देऊन व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशा वर्कर्स यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर आशा वर्कर्स सुनंदा माळी, मंगला बिल्लोरे ,ललिता मराठे, अरुणा कराड, संध्या सोनवणे, आशा बडगुजर, योगिता वाणी, दिपाली सोनवणे, नैना माळी, कल्याणी माळी, स्वाती माळी, छाया तायडे ,यांच्या सह्या आहेत.

Protected Content