चोपडा प्रतिनिधी । राज्यातील आशा-गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून या निर्णयाचे आयटकने स्वागत केले आहे. दरम्यान, वेतनवाढ मान्य करण्यात आल्याने ३ जुलै रोजी पुकारलेला नियोजीत संप स्थगित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य आशा – गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने ३ जुलै २०२० राज्यव्यापी बेमुदत संपा ची हाक दिली होती. यापूर्वी गेल्यावर्षी १४ दिवसाचा संप ११ मे ते १३मे तीन दिवस निषेध करण्यात आला होता. यासोबत राज्यभर मुख्यमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर २५ जून रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आशाना २ हजार रुपये व गट प्रवर्तकना ३ हजार रुपये मासिक मानधन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जुलै २०२० पासून त्याची अंमलबजावणी करणार आहेत. यामुळे राज्य भरातील ७० हजार आशा व ३५१० हुन अधिक गट प्रवर्तकना लाभ मिळणार आहे या निर्णयाचे आयटकने स्वागत केले आहे.
या संदर्भात आशा व गटप्रवर्तक संघटना, जिल्हा आयटक व कृती समिती तर्फे जिल्ह्याचे कामगार नेते कामरेड अमृत महाजन राज्य अध्यक्ष राजू देसले सुमन पुजारी व जिल्हा पदाधिकारी सुलोचना साबळे मीनाक्षी सोनवणे आशा पाटील विद्या देवी कोळी, शालीनी पाटील, मनिषा पाटील, ललिता सोनार, सरला माळी, रंजना धनगर, शैला परदेशी, प्रतिभा पाटील, सुनीता ठाकरे, कविता सरोदे आदींनी स्वागत केले आहे हा आशा गट प्रवर्तक एकजुटीचा विजय आहे असे म्हटले असून … आशाना सप्टेंबर २०१९ पासून झालेल्या वाढीचा शासन निर्णय संदर्भात शासनाशी चर्चा करणार आहे.
आशा व गटप्रवर्तक ना कर्मचारी दर्जा प्राप्त व्हावा, वेतन श्रेणी लागू व्हावी, या साठी संघर्ष सुरू च राहील. तथापि या मानधन वाढीच्या निर्णयच स्वागताच्या पार्श्वभूमीवर ३ जुलै पासूनच अशांचा बेमुदत संप स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. देशभर कामगार केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणासाठी देशातील मोठ्या कर्मचारी संघटननानी पुकारलेल्या निषेध दिनात सहभागी व्हायचे आहे. योजना कर्मचार्यांना कायम करावे, आशा व गट प्रवर्तक यांना दैनिक ३०० रु प्रमाणे भत्ता द्या, सर्व कामाचा मोबदला भुसावळ येथील मयत आशा यांना ५० विमा मिळावं इत्यादी मागण्या साठी राज्य भर बेमुदत संपा ऐवजी एक दिवसीय निषेध दिन पाळावा. आपली एकजुट कायम ठेवून मागण्या साठी पाठपुरावा कृती समिती करेल अशी ग्वाही कॉम्रेड अमृत महाजन यांनी दिली आहे.