आशा गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी आयटकतर्फे उद्यापासून आंदोलन

चोपडा प्रतिनिधी । जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटना आयटकतर्फे उद्यापासून ठिकठिकाणी आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

याबाबत माहिती अशी की, आज कोरोना महामारी काळात मोदी सरकारची धोरणे कामगार व जनता विरोधी जात असल्याने देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे. म्हणून ७ ते ९ ऑगस्ट रोजी केंद्रीय कामगार संघटनांनी हेदेशव्यापी आंदोलन घोषित केलेले आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाने गेल्यावर्षी 16 सप्टेंबर 2019 रोजी आशा/गटप्रवर्तक यांच्या संपात आशांना २ हजार रुपये वाढ देण्यासाठी काढलेला जिल्हात यांची अंमलबजावणी केलेली नाही, त्याऐवजी १ जुलै २०२० पासून आशा गटप्रवर्तक मानधन वाढ देण्याचा निर्णय काढलेला आहे. परंतु सर्व शहरी व ग्रामीण अशा गटप्रवर्तक महिलांना घोषित वाढ १ सप्टेंबर २०१९ पासूनच मिळावयास पाहिजे. या मागणीबरोबर आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन मिळावयास पाहिजे. निर्णय होईपर्यंत पुढील काळामध्ये सुद्धा आंदोलने करावी लागणार आहेत. आशांना १८ हजार रुपये गटप्रवर्तक यांना २१ हजार रुपये मिळावे, देशातील कोणतेही कामगार कायदे रद्द करता कामा नयेत, कामगार कायदे रद्द करण्यास केंद्र सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

७ ऑगस्ट रोजी सर्वांनी कामाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. शक्य त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, तहसील कार्यालय याठिकाणी सह्यांची निवेदन देऊन आंदोलने केली जाणार आहेत. जळगाव जिल्ह्यात सुद्धा ७ ऑगस्ट रोजी चोपडा येथे ८ ऑगस्ट रोजी भुसावळ येथे टीएमओ कार्यालय व १० ऑगस्ट रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले जाणार आहे. जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तकांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक तर्फे अमृत महाजन, सुलोचना साबळे, संगीता सातपूते, मालुसरे नरवाडे, मीनाक्षी सोनवणे, प्रतिभा पाटील, वैशाली धनगर , शालिनी पाटील, विद्यादेवी कोळी, विद्या पाटील, आरती धनगर, छाया पाटील, आशा पाटील, शैला परदेशी, सरला माळी, मनिषा पाटील, रंजना धनगर आदींनी केली आहे.

Protected Content