Home राजकीय आले तर ठिक….नाही तर स्वतंत्र !- मुख्यमंत्री

आले तर ठिक….नाही तर स्वतंत्र !- मुख्यमंत्री

0
66

जालना प्रतिनिधी । सोबत आले तर ठिक नाही तर स्वतंत्र लढण्यास तयार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज युतीसाठी आपण झुकणार नसल्याचे स्पष्ट केले.

जालना येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, आम्हाला युती हवी आहे. आम्ही युतीसाठी प्रयत्न करीत आहोत. याउपरही भारतीय जनता पक्ष लाचार आहे, असं जर कुणाला वाटत असेल, तर हा त्यांचा भ्रम आहे. भाजप कधीच लाचार होऊ शकत नाही. आम्ही शून्यातून जग उभे करणारे लोक आहोत, असे मुख्यमत्री म्हणाले. जे हिंदुत्व मानतात, ते आमच्यासोबत येतील. हिंदुत्व नकोय, ते विरोधात जातील. मात्र, कोणत्याही परिस्थितीत या देशात मोदींचे सरकार पुन्हा स्थापन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound