तासगाव, जिल्हा सांगली । राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील आबा यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या समाधीस्थळी मान्यवरांनी अभिवादन केले.
तासगाव तालुक्यातील अंजनी येथे आर.आर. आबा पाटील यांची समाधी आहे. आज त्यांच्या पाचव्या स्मृती दिनी मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, आमदार मानसिंग नाईक, आबांच्या मातोश्री भागिरथी पाटील, पत्नी आमदार सुमन पाटील, मुलगा रोहित, बंधू राजाराम पाटील तसेच्या त्यांच्या अन्य कुटूंबियांनी आबांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आज दिवसभर सर्वसामान्य जनतेनेही आपल्या लाडक्या नेत्याचे स्मरण केले.