आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क व भत्ता देण्याची आयटकची मागणी

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्वरीत मास्क, भत्ता व इतर वस्तू उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचे निवेदन आयटकच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, भारतासह जगात कोरोनाची मोठ्या प्रमाणावर संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे साफाई कर्मचारी यांना मास्क, साबण, बुट, घाण भत्ता, धुलाई भत्ता नगरपालिकेने त्वरीत उपलब्ध करून द्यावेत तसेच आशा गटप्रवर्तक स्त्रीपरिचर आदी आरोग्य क्षेत्राशी संबंधित कर्मचारी यांनाही ही विनाविलंब मास्क व साबण उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आयटकच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
निवेदन देतांना राज्य उपाध्यक्ष अमृत महाजन, जिल्हा पदाधिकारी सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे, जनाबाई सुंबे, प्रतिभा पाटील, अरुण गायकवाड, संतोष खरे, मलखान राठोड, सुभाष कोळी, किशोर खंडारे इत्यादींनी केली आहे. तसेच सरकारनेही निवड भाषणबाजी करू नये असे आवाहन केले आहे.

Protected Content