Home Cities जळगाव आरोग्य सभापतींचे वाहन अडविले

आरोग्य सभापतींचे वाहन अडविले

0
31

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील यांचे शासकीय वाहन मद्यपींनी अडवून गोंधळ घातल्याची घटना शहरात घडली.

सभापती दिलीप पाटील हे शासकीय वाहनाने त्यांचे भाऊ चंद्रशेखर पाटील व कमलाकर पाटील यांच्यासोबत निवृत्तीनगरात चालले होते. गेंदालाल मिल परिसरात चार मद्यपी रस्त्यावरच शिवीगाळ करत गोंधळ घालत होते. पाटील यांनी चालकाला वाहन थांबवण्यास सांगितले. चालकाने वाहन बाजूला लावले. मद्यपींनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. गर्दीत एकाने चंद्रशेखर पाटील यांच्या खिशातून मोबाइल व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दिलीप पाटील यांनी पोलिसांना बोलवले. यानंतर हा वाद मिटला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound