आरोग्याची काळजी घेत, जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या – जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा

बुलडाणा प्रतिनिधी । देशात कोरोना वायरस तोंड वर काढले आहे. या अनुषंगाने शासनाच्या पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांनी जिल्हावासीयांनी सतर्क व दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

संपुर्ण जगात कोरोनाने कहर केला आहे. जिल्हावासीयांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत सतर्क आणि दक्ष राहवे, अतिमहत्वाचे कारण असेल तरच आपण बाहेर पडू शकता, तसेच जिल्हा प्रशासनावर कोणताही ताण पडणार नाही याचा काळजी घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांनी केले आहे.

जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंदे
गेल्या चोवीस तासांमध्ये फक्त महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 64 झाली आहे. म्हणजे 12 रुग्ण मागील 24 तासात वाढले आहे. याकरिता उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने आत्मसात करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंदे यांनी आज केले.

बुलडाणा कोरोना अलर्ट
– घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली असलेले एकूण नागरिक – ४७,
– २० पर्यंत घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली असलेले नागरिक – ४६,
– आज दि. २१.३.२०२० रोजी नवीन निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले नागरिक – ०३
– घरात स्वतंत्र खोलीत निरीक्षणात १४ दिवस पूर्ण केलेले नागरिक जे निरिक्षणातून मुक्त करण्यात आले – ०२
शाप्रकारे घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली असलेले नागरिक -४७ संशयीत आहे अशी माहिती ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Protected Content