आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविवण्याचे प्राथमिक शिक्षण विभागाला शिक्षण संचालकांचे पत्र प्राप्त

जळगाव, प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या आरटीईअंतर्गत  २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचलकांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेशप्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत ७ एप्रिल रोजी काढण्यात आली आहे.  ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत निवड यादीत लॉटरी लागली आहे. त्याच पालकांनी शाळेत जाऊन विहित मुदतीत प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे.
सन २०२१-२२ यावर्षाची आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरु करण्यात यावी. जिल्ह्याततील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबतचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागस्तरावरुन घेण्यात यावा व तशा सूचना प्रसिद्ध करण्यात याव्यात. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात यावा. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करु नये. शाळांनी त्यांना आरटीई पार्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे. त्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पार्टलवर द्यावा. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे.त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रति घेऊ शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात. त्यामुळे रहिवाशी प्यांचा पुरावा इत्यादी कागदपत्रांवरुन शाळा व निवासी पत्याच्या अंतराची पडताळणी करावी. निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समिती, शिक्षणाधिकारी यांचेकडे अर्ज करण्यास सांगावे. पडताळणी समितीने आलेले अर्ज व तक्रारींची शहानिशा करुन प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरु होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा नेवू नये, याबाबतचा आदेश शाळेला द्यावा. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून राबविण्याचे निर्देश शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला पत्राद्वारे दिले आहे.

Protected Content