जळगाव प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांना फोनद्वारे जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
असे आहे प्रकरण –
फिर्यादीनुसार, सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार प्यारेलाल गुप्ता (वय-४४) रा. घरकुल शिवाजी नगर हे गेल्या आठ वर्षांपासून माहिती अधिकारी कायद्यांर्गत काम करणारे कार्यकर्ते आहेत. बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याबाबत माहिती अधिकारान्वये तपसील मागवले होते. याचे वाईट वाटून १७ जून रोजी दुपारच्या सुमारास वाळूवाहतूक करणारे विठ्ठल पाटील, मोगली (पुर्ण नाव माहिती नाही), विक्की (पुर्ण नाव माहिती नाही), वैभव (पुर्ण नाव माहिती नाही) व अन्य तीन जणांपैकी विठ्ठल पाटील याने जिल्हाधिकारी कार्यालयातील मेन गेटवर अडविण्याचा प्रयत्न केला मात्र गुप्ता तेथून निघून गेले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान शिवाजी नगरातील डी.बी.जैन दवाखान्याजवळून बजाज मोटारसायकलने जात असतांना वरील सर्वांनी रस्त्यात आडवून, “गुप्ताजी तुम हमारी तक्रार क्यू करते हो, हम लोगोको कुछ कामधंदे नही, हमको नोकरी नही है, हम सब नंX लXX. है, हम तुम्हारा काम खराब कर देंगे, हम वाळू चोरी करनेवालोके दो गट है, हमारे मे दुश्मनी निकालते हो, और हमारे हमारे झगडे लगाते हो, हमे तहसीलदार वैशाली हिंगे और प्रांत चौरे मॅडमने सब बताया है, हम कुछ भी कर सकते है ।” असे सांगून गुप्ता यांच्या मनाविरोधात गाडीची चावी काढून एक तास विनाकारण थांबवून ठेवले होते. हे सर्व बोलत असतांना त्यांनी सर्व व्हिडीओ क्लिप रेकॉर्ड केली होती. सदरील क्लिप सातही जणांनी व्हायरल केली. याबाबत गुप्ता यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांना ईमेद्वारे पाठविण्यात आले आहे. दरम्यान आज १९ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दिपककुमार गुप्ता यांना त्यांच्या मित्राच्या मोबाईलवर विठ्ठल पाटील याने फोन करून शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.