जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोना विषाणूचा प्रसार गतीने वाढत असून कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे तो भाग कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येतो. अशा भागात झोन इनचार्ज ऑफीसरांची नियुक्ती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.
कोरोना बाधीत रुग्ण ज्या परिसरात आढळून येतो तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येतो. तेथे विविध उपाययोजना व घ्यावयाच्या दक्षतेबाबत महापालिका दवाखाना विभाग, अतिक्रण विभाग, प्रभाग अधिकारी, पोलीस विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अशा विविध विभागांशी समन्वय ठेवण्यासाठी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी नुकतीच बैठक बोलविली होती. यात त्यांनी कंटेनमेंट झोन इनचार्ज ऑफीसरांची नियुक्ती केली. यात त्यांनी प्रभाग समिती क्र ४ – वार्ड क्र. १२ समता नगर (धामणगाव वाडा ) , वार्ड क्र. १० खंडेराव नगर येथे अनुक्रमे आर. टी. पाटील व मिलिंद जगताप यांची नियुक्ती झोन इनचार्ज ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. प्रभाग समिती क्र ३ – वार्ड क्र. १३ नेहरू नगर येथे संजय नेमाडे, वार्ड क्र. १३ संत गोधडीवाला हौसिंग सोसायटी येथे सुहास चौधरी, वार्ड क्र. १८ अकसा नगर मेहरूण येथे अतुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग समिती क्र १ – वार्ड क्र. २ पवन नगर (सात खोल्या ) येथे शकील शेख , वार्ड क्र. ५ शाहू नगर येथे समीर बोरोले, वार्ड क्र. ५ ओंकार नगर येथे संदीप अर्जुनमोरे, वार्ड क्र. ६ प्रताप नगर येथे योगेश वाणी तसेच वार्ड क्र. ८ मानस आपार्टमेंट येथे प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबत प्रभाग समिती क्र २ – वार्ड क्र. ३ गोपाळपुरा ( जुने जळगाव) येथे विलास नेहते, वार्ड क्र. १६ सिंधी कॉलोनी येथे प्रसाद पुराणिक, वार्ड क्र. ४ जोशी पेठ, मारोती पेठ, भावसार मंगल कार्यालय येथे मनीष अमृतकर तसेच वार्ड क्र. १६ सम्राट कॉलोनी येथे अरुण पाटील यांची कंटेनमेंट झोन इनचार्ज ऑफिसर म्हणून आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी नियुक्ती केली आहे.