गया (वृत्तसंस्था) बिहारमधील गयाच्या अनुग्राह नारायण मगध मेडिकल कॉलेज व रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेवर आरोग्य कर्मचाऱ्याने दोन दिवस बलात्कार केला. यामुळे अतिरक्तस्त्रावामुळे महिलेसह बाळाचाही मृत्यू झाल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येत होती. यासाठी 25 मार्च रोजी ही महिला लुधियानाहून आपल्या पतीसमवेत रुग्णालयात आली होती. परंतु महिलेची कोरोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले. पण घरी गेल्यानंतर महिलेला जास्त रक्तस्त्राव सुरु झाला आणि तिचा दुसर्याच दिवशी मृत्यू झाला. यानंतर माझी सून रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार होती. परंतु रुग्णालयातील गेटमॅनने तिला इज्जतीची भीती दाखवली. ती घाबरली आणि तिने तक्रार केली नाही असा दावा महिलेच्या सासूने केला आहे. माझी सून व तिच्या जन्मलेल्या बाळाच्या मृत्यूला आरोग्य कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप मयत महिलेच्या सासूने केला आहे.