बंगळुरू वृत्तसंस्था । करोनाच्या प्रादूर्भावामुळे कर्नाटक सरकारने आयपीएलचे सामने रद्द करण्याची मागणी केली आहे. यामुळे आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
महाराष्ट्रात आयपीएलच्या सामन्यांबाबत अजून अनिश्चिीतता असतांनाच आता कर्नाटक सरकारने आयपीएलवर बंदी घालावी किंवा पुढे ढकलावी, अशी मागणी थेट केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली तर बंगळुरुमध्ये सामने होणार नाहीत. जर बंगळुरुमध्ये सामने होऊ शकले नाहीत, तर हा कर्णधार विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) यांना मोठा धक्का असेल.
आरसीबीचे सामने बंगळुरुला होणार नसतील तर आरसीबीला गृह मैदानावरील पाठींब्याचा लाभ होणार नाही. दरम्यान, याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.