आयपीएलचे सर्व सामने रद्द : राजीव शुक्ला यांची घोषणा

 

 

मुंबई  : वृत्तसंस्था ।  सध्या सुरू असणारी इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल ही स्पर्धा रद्द करण्यात आले असून आज बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत घोषणा केली आहे.

 

कोरोनाची आपत्ती सुरू असतांनाही देशात आयपीएलचे केलेले आयोजन हे वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. यातच काल कोलकाता नाईट रायडरचे दोन खेळाडू हे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने या संघाचा सामना रद्द करण्यात आला होता. यानंतर आता ही स्पर्धाच रद्द करण्यात आली आहे.

 

आज  मुलाखतीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल रद्द केल्याची माहिती दिली आहे.

Protected Content