मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्यात नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित आणि उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती केली आहे की, आर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित आणि उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी. तसेच २३४ बी अंतर्गत व्याज वाचवण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. फेब्रुवारी २०२० ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे. त्यालाही मुदतवाढ देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.