आयकर खात्याच्या धाडीत १ हजार कोटी रोकडा सापडले !

चेन्नई : वृत्तसंस्था । येथील एका आयटी इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर ग्रुपच्या संबधित आयकर विभागाच्या एका पथकानं मदुराई आणि चेन्‍नईसह पाच ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत आयकर विभागानं १००० कोटी रुपये रोख रक्कम जप्त केल्याचं समोर आलं आहे.

आयकर विभागाच्या एका आधिकाऱ्यानं मोठ्या घोटाळ्याची शक्यता वर्तवली आहे. आयकर विभागनं जप्त केलेल्या १००० कोटी रुपयांचा कोणताही हिशेब किंवा नोंद त्यांच्याकडे नाही. ४ नोव्हेंबर रोजी आयकर विभागाच्या एका पथकानं छापेमारी केली होती.

सिंगापूरमधील एका नोंदणीकृत कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याचा संशय आयकर विभागाला असून त्या संदर्भातील पुरावेही त्यांच्या हाती लागले आहेत. छापा मारण्यात आलेल्या कंपनीशिवाय अन्य प्रसिद्ध अशा इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर डेवलपमेंट आणि फायनेंशल ग्रुप कंपनीनेही यामध्ये शेअर विकत घेत गुंतवणूक केली आहे.

आयकर विभागानं ज्या कंपनीमध्ये छापेमारी केली त्यांच्याकडे ७२ टक्क्यांचे शेअर आहेत. पण प्रत्यक्षात त्यांनी खूप कमी गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय इतर कंपन्यांचे शेअर कमी असले तरी गुंतवणूक जास्त आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये स्थायिक असलेल्या कंपनीला चेन्नईतील या कंपन्यांनी तब्बल ७ कोटी सिंगापूर डॉलर (२०० कोटी भारतीय रुपये)चा फायदा करुन दिला आहे. पण कंपनीनं याबाबतची माहिती लपवली आहे.

ब्लॅक मनी अॅक्ट, २०१५ नुसार यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. गुंतवणुकीची रक्कम २५४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.’

Protected Content