जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी घेतलेल्या शैक्षणिक मूल्यांच्या प्रस्थावांचा निकाल जाहीर झाला असून केसीई आयएमआर ला सलग ‘अ ‘मानांकन प्राप्त होत आहेत. या वेळीही संस्थेने या ‘अ ‘ दर्जाचे मानांकन प्राप्त केले आहे.
विद्यापीठाच्या वतीने या मान्यांकन करीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते कमिटीने त्याचे मूल्यांकन करून मानांकन जाहीर केले आहे. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांचे संस्थेची प्रत आणि पट टिकवून ठेवण्यात नेहमीच मोलाचे मार्गदर्शन असते व्यवस्थापन मंडळाने संचालिका डॉ शिल्पा बेंडाळे अयकेडेमिक डीन डॉ तनुजा फेगडे व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. आय एम आर ही एआयसीटीई मार्फत दिल्या जाणाऱ्या “एन बी ए” मान्यांकन व्यवस्थापनशास्त्रातील एकमेव संस्था आहे.