आयएमआरमध्ये ‘युवतीसभे’चे आॅनलाईन उद्घाटन

 

जळगाव, प्रतिनिधी ।केसीईज आयएमआरमध्ये युवती सभेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने  ‘सायबर सुरक्षा आणि कायदे:  महिलांसाठी आवश्यक माहीती’ या विषयावर बेविनारचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी प्रस्तावना केली. युवती सभा समन्वयक रुपाली सरोदे यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली.

याप्रसंगी बोलतांना प्रमुख वक्त्या अॅड. डॉ. विजेता सिंग म्हणाल्यात, ‘संपुर्ण भारतात विषेशतः महिला आणि मुलींना हा त्रास मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो आहे.  त्यात हॅकिंग आणि बुलींग पासुन सायबर स्टेलींग, सायबर  बदनामी, बाल अश्लीलता, सायबर बुलिंग, सायबर स्टॅकिंग, फेसबुक, वाॅट्स अप, ईमेल मधून होणारी हॅरॅसमेंट, या प्रकारांवर त्यांनी प्रकाश टाकला. सायबर गुन्हे तज्ञ कविता दातार म्हणाल्यात ]अजिबात लाईकच्या मोहात पडू नका. ५००० फाॅलोवर्स आहेत म्हणुन फार खुश होऊ नका. मित्राच्या मित्राच्या मित्राला तुम्ही ओळखत नाही. फोटो बघुन अॅड करतात हे अत्यंत धोकादायक आहे. तुमच्याच नावाचे संग्दीग्ध अकाऊंट फेसबुक कोणी तयार करुन टाकलेले लक्षात आले तर फेसबूकवर रिपोर्ट करा. सायबर सेलला कंप्लेंट करा. वेळीच सावध व्हा. पुणे पोलिसांमध्ये कार्यरत सायबर तज्ञ वरिष्ठ पोलिस अधिकारी दिपक लगड म्हणालेत, ‘पुणे शहरात २०१२ मध्ये १००० सायबर गुन्ह्य़ाची नोंद झाली होती, २०१७ मध्ये ७००० सायबर गुन्हे नोंदवले गेलेत तर आता २०२० मध्ये १२००० केसेस आजवर झालेल्या आहेत. यावरुन या गुन्ह्याचे स्वरुप लक्षात येईल. पण न घाबरता महिला मुलींनी तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे. समन्वयक रुपाली सरोदे यांनी आभार मानले. त्यांना तंत्र साहाय्य प्रा. खान, अमोल पांडे यांनी केले. ह्या बेविनारला १०० महिला आणि विद्यार्थीनींनी उपस्थिती दिली.

Protected Content