जळगाव, प्रतिनिधी | येथील के.सी.ई. सोसायटी संचलित आय.एम.आर. महाविद्यालयातर्फे उद्या (दि.२५) महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बॉक्स क्रिकेट लिग मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी १८ संघांनी नावनोंदणी केली असुन स्पर्धेचे लॉटस आज काढण्यात आलेत. या एक दिवसीय स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत असुन स्पर्धेसाठी प्रोफेशनल अंपायर्स उपस्थित असतील असे आय.एम.आर.च्या डायरेक्टर प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी कळवले आहे. ही स्पर्धा आय.एम.आर.च्या पार्कीगमध्ये होणार असुन प्रत्येक संघाला दोन मॅचेस खेळण्यास मिळणार आहेत. या स्पर्धेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नील खडसे, सलोनी पाटील, आयुष गौड आणि आयएमआरच्या फिझीकल डायरेक्टर निलीमा पाटील परिश्रम घेत आहेत.