आमदार भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

जळगाव, प्रतिनिधी । आमदार  राजुमामा भोळे यांचा ५६ वा वाढदिवस  भाजपा जिल्हा महानगरतर्फे विविध सामाजिक व जन लोकहितार्थ  उपक्रम घेऊन साध्या पद्धतीने  साजरा करण्यात आला.    

 

आमदार  राजुमामाम  भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरातील ९ मंडळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आले.  राम मंदिर कारसेविका ऋता मेलाग यांच्या हस्ते  बूथ क्रमांक २३३ मध्ये  वृक्षारोपण करून सप्ताहाची सुरूवात  केली.  युवा मोर्चातर्फे नेत्र तपासणी व नेत्र दान संकल्प करण्यात आले.  कार्यक्रमांनची सुरुवात  महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. भाजपा जिल्हा महानगरतर्फे शहरातील ३६५ बूथ वर वृक्षारोपण सप्ताह  महानगरातील ९ मंडलांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वृक्षारोपण,  जिल्हा महानगराध्यक्ष  दीपक सूर्यवंशी , स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गट नेते भगत बालाणी, जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक यांच्या हस्ते ९ मंडळात कार्यक्रम घेण्यात आले  यात मंडळ क्र.१, शिवाजी नगर, स्मशानभूमी येथे. मंडल क्र.२, वाल्मिक नगर, कांचन नगर रेल्वे लाईन परिसर.मंडल क्र.३, अयोध्या नगर, बलराम सोनवणे व्यायाम शाळे जवळ. मंडल क्र.४, रिंग रोड, महाराणा प्रताप चौक. मंडल क्र.५, पिंप्राळा, दादावाडी परिसर मंडल क्र.६, रामानंद नगर मंडल, एमजे कॉलेज मागे. मंडल क्र.७, झुलेलाल मंडल, अंध शाळे जवळ, मंडल क्र.८, मेहरूण स्मशानभूमी येथे .मंडल क्र.९, महाबळ चौक परिसर येथे,तसेच भाजयुमो तर्फे जुने इंडो अमेरिकन हॉस्पिटल येथे नेत्रदान संकल्प फॉर्म भरून घेण्यात आले.तर या प्रसंगी सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, कोषाध्यक्ष प्रा. जीवन अत्तरदे, विधान क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, उपाध्यक्ष सुशील हसवणे, चिटणीस राहुल वाघ, नीला चौधरी, महेश चौधरी, प्रा. भगतसिंग निकम, जिल्हा पदाधिकारी मनोज भांडारकर, अक्षय चौधरी, धिरज वर्मा, प्रकाश पंडित, नगरसेविका  अॅड.  शुचिता हाडा,  गायत्री राणे, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, केदार देशपांडे, शक्ती महाजन,  संजय लुल्ला,  विनोद मराठे, निलेश कुलकर्णी, आघाडीचे अध्यक्ष  दीप्ती चिरमाडे, निशिकांत मंडोरे, आनंद सपकाळे, प्रमोद वाणी, कुमार श्रीरामे, अरुण श्रीखंडे, अशोक राठी,  प्रभाकर तायडे, जयेश भावसार,  रेखा वर्मा, अमित साळुंखे, लता बाविसकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content