मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुळे रिगावचे सरपंच, निर्मला सोनाजी पारधी यांनी राष्ट्रवादीला सोड चिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत या प्रवेश प्रसंगी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख छोटुभाऊ भोई, अल्पसंख्यक जिल्हा प्रमुख अफसर खान, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटिल, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, उपतालुका प्रमुख नवनीत पाटिल, गट नेते गणेश टोंगे, शहर प्रमुख पंकज पांडव, अल्पसंख्यक तालुका प्रमुख अकबर ठेकेदार, गण प्रमुख जावेद खान, सोनाजी पारधी, युवासेना शाखा प्रमुख छोटू पाटिल, शिवसेना शाखा प्रमुख दिलीप पाटिल, प्रफुल पाटिल, तसेच शिवसेना महिला आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यांचे समक्ष हा प्रवेश सोहळा पार पडला.