मुंबई (वृत्तसंस्था) इकडे तर कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, तिकडेच कुणीतर होईल लक्षात ठेवा. काही आज गैरहजर आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत चांगलीच फटकेबाजी केली.
राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असे सांगत काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा देणाऱ्या भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की, “राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल अंस म्हणत पुढची पाच वर्ष तिथं काढलीत तरी चालतील. असं सांगतंच तुम्हाला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. नाही तर तुमचीच माणसं इकडे तिकडे जातील. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा. बरेच जण गैरहजर आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा.