आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानचा आंबेडकरी अस्मिता पुरस्कार सोहळा संपन्न (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानचा आंबेडकरी अस्मिता पुरस्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात रविवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थीत उत्साहात घेण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सचिन जोंधळे होते तर प्रमुख अतिथी एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी, अभिनेते हेमंत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला वैभव सोनवणे यांनी वंदन गीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते तथागत बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. राजेंद्र भालेराव प्रतिमेस माल्यार्पणन करण्यात आले.

यावेळी नेट परिक्षेत हर्ष जोशी ९८.५६ टक्के गुण मिळविल्याने डॉ. जोंधळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तर जालना येथील नाटकाचे लेखक राज कुमार तांगडे यांना राजश्री शाहू महाराज पुरस्कार, पुण्याचे डॉ. संबोधी देशपांडे यांना डॉ. बाबासाहेबर आंबेडकर पुरस्कार तर जळगाव येथील साहित्यीक भगवान नन्नवरे यांना महात्मा ज्योतीबा फुले पुरस्काराने मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब पुर्णाकृती स्मृती चिन्ह, सन्मान चिन्ह व शॉल हे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. यावेळी सत्कारमुर्ती नाटकाचे लेखक राज कुमार तांगडे , पुण्यातील डॉ. संबोधी देशपांडे आणि जळगाव येथील भगवान नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक हरीचंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ आम्रपाली, दिपक जोशी, विलास यशवंते, विठ्ठल भालेराव, भाऊराव सुरळकर, कुलदिप भालेराव, प्रबुध्द भालेराव यांनी परिश्रम घेतले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2111206932390998

 

Protected Content