मुक्ताईनगर प्रतिनिधी । आपसातील भांडणासाठी पोलीसात तक्रार दिल्याचा रागातून दोघांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील लालगोटा येथे घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लालगोटा येथील रहिवाशी पाटीलबाई राजमल पवार (वय-५०) यांचे किरकोळ कारणावरून पोलीसात गावातील काही जणांच्या विरूध्द तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून ११ फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी विजानंद सुभाष पवार, आनंद विजानंद पवार, मोहनचंद विजानंद पवार, दुर्योधन सुभाष पवार, धिरजकुमार दुर्योधन पवार, औपेश रामलखन पवार, सौपेश रामलखन पवार आणि बब्बी सुभाष पवार सर्व रा. लालगोटा ता. रावेर यांनी बेकायदेशीर मंडळी जमा करून पाटीलबाई पवार यांच्यासह इतर एकाला लाठ्याकाठ्या व दगडांनी बेदम मारहाण केली. यात दोघे गंभीर जखमी झाले. पाटीलबाई पवार यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नऊजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोऊनि परविन तडवी करीत आहे.