जळगाव, प्रतिनिधी। जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत ते बळीराम पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान मागील एक महिन्यापासून ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे. या रस्त्याचे काम त्वरित व्हावे यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत महापौरांनी संवाद साधून समजूत काढल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले.
जिल्हा परिषदेची नवीन प्रशसकीय इमारत ते बळीराम पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान मागील महिन्यापासून ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणत वाहनांची वर्दळ असते रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी होती. दरम्यान आज शिवसेना बळीराम पेठ विभाग प्रमुख विपीन पवार, उपविभाग प्रमुख जितेंद्र गवळी, शाखा प्रमुख निर्भय पाटील, उमेश तायडे, गणेश गवळी, दीपक गवळी, रुपेश पाटील, ललित भोळे या शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, त्याच वेळी तेथून महापौर सौ. भारती सोनवणे जात असता त्यांनी चौकशी करून समस्या जाणून घेतली. त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून रखडलेले काम दोन दिवसात पूर्ण करण्यात यावे अशा सूचना दिल्या. महापौरांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2807915362859388