आदीवासी एकता परिषदेच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस

 

  यावल :  प्रतिनिधी  । येथील एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास कार्यालयासमोर जळगावच्या शासकीय मुलांचे वस्तीग्रुह येथील नवीन पाणी पुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आदीवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे

 

या उपोषणाला बहुजन वंचीत आघाडी व ऑल इंडीया आदीवासी एम्पलॉइज फेडरेशन यांनी पाठींबा दिला आहे . यावल येथील आदीवासी एकात्मीक प्रकल्प विकास कार्यालयासमोर आदीवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष करण सोनवणे व त्यांचे सहकारी यांनी  भ्रष्टाचार करणाऱ्यां दोषींवर निलंबनासह कठोर कारवाई  व्हावी या मागणीसाठी ११ ऑगस्टपासुन आमरण उपोषण  सुरू केले आहे उपोषणर्कत्यांचे लक्षणीय वजन कमी झाले असुन त्यांची प्रकृती खालवली आहे .

 

या भ्रष्टाचार विरोधातील लढ्याला विविध राजकीय पक्षासह ऑल इंडीया आदीवासी एम्पलॉर्ड्ज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश  वसावे, जिल्हा उपाध्यक्ष सलीम तडवी व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यानी तसेच बहुजन वंचीत आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शफीभाई शेख , राजेन्द्र बारी , विजय सावकारे यांनीही पाठींबा दिला आहे .

 

यावल, चोपडा, रावेर हे तालुके  संपुर्ण आदीवासी क्षेत्र असुन यावल तालुक्याला  चोपडा आणी रावेर मतदारसंघ जोडले गेले आहेत  दोघ विधानसभेचे आमदार यावल परिसरात आदीवासींना खावटी वाटप करीत असतांना दिसुन येत असले तरी यावल आदीवासी एकात्मीक कार्यालयासमोर पाच दिवसांपासुन आदीवासी बांधव  हक्क मिळवण्यासाठी उपोषणाला बसलेले आहे याची त्यांना माहीती असतांना या दोघा आमदारापैकी कुणीही उपोषणकर्त्यांच्या भेटीला येवु शकले नाही याचा अर्थ यांचा आदीवासींवर किती प्रेम आहे हे दिसुन येत असल्याची संत्पत प्रतिक्रीया उपोषणाच्या ठीकाणी आदीवासीकडुन व्यक्त करण्यात येत आहे .

 

Protected Content