ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार

जळगाव प्रतिनिधी | रस्त्यात फसलेली सायकल बाजूला करणार्‍या प्रौढ व्यक्तीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शहरात घडली.

याबाबत वृत्त असे की, सुरेश देविदास सोमवंशी (वय ५५ रा कासमवाडी) हे शिलाई मशीन दुरूस्तीचे काम करतात. आज सकाळी दहाच्या सुमारास ते घरून निघाले. थोड्या अंतरावरच रस्त्यातील चिखलात त्यांची सायकल अडकली. यामुळे खाली उतरून ते बाजूला काढायला लागले. एवढ्यात भरधाव वेगाने आलेल्या एमएच १९ एपी ७३३० या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्यांचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणले. मयत सुरेश देविदास सोमवंशी यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content