जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या आदिवासी समाजाला आदिवासी विभागाकडून अर्थसहाय्य मिळण्यासाठी एकलव्य संघटना शाखा जळगावतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देवून मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजाची कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. आदिवासी समाजाला जीवन जगणे कठीण झाल्याने आदिवासी विभाग व शासनातर्फे आदिवासी समाजाला खावटी कर्जाच्या माध्यमातून खावटी कर्जसहीत अर्थसहाय्य मिळावे, तसेच शिधापत्रिका, जातीचे दाखले, घरपोच मिळावे यासह आदि मागण्या करण्यात आल्या.न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक पवित्रा घेतल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ना.शिवाजीराव ढवळे, जिल्हाध्यक्ष सुधाकरराव वाघ, निवृत्ती पवार, मंगल सोनवणे, सोपान सुर्यवंशी आदिंनी दिला आहे. निवेदनात भानुदास भिल, बापु सोनवणे, सुनिल सोनवणे, श्रावण भिल, शिवदास भिल, संजय मोरे, उमेश मालचे, रामदास भिल, संदिप पवार आदिंच्या सह्या आहेत. निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी एकलव्य विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, जिल्हाध्यक्ष सुधाकरराव वाघ आदि उपस्थित होते.