जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील पत्रकार भवनात शुक्रवारी ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आदिवासी टोकरे कोळी व इतर जमातीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दशरथ भांडे यांनी आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन केले.
आयोजित मेळाव्या विविध विषयांवर मंथन करण्यात आले. समाजाच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने जळगाव शहरातील बळीरामपेठ येथे असलेल्या पत्रकार भवनात शुक्रवारी ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आदिवासी टोकरे कोळी व इतर जमातीचा मेळावा घेण्यात आला. हा मेळावा महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला नरवीर तानाजी मालसुरे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, स्वातंत्र्यसेनानी जलकारी, आद्यकवी रामायणकार चक्रवर्ती सम्राट, वाल्मीक महर्षी व्यास यांच्या प्रतिमांचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीच्या विविध आघाड्यांच्या संघटत निवड झालेल्या सदस्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत होणारा शासकीय अन्याय थांबवा व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व आदिवासी सल्लागार समिती विकास विभाग बरखास्त करावी, आदिवासी टोकरे कोळी व इतर आदिवासी जमातींना मिळणारा बजेटचा हिस्सा यावर होणारा अन्यायाबाबत तीव्र निषेध करण्यात आला तसेच न्यायमूर्ती हारदा समितीच्या अहवालांचे अंमलबजावणी करण्यात येऊ नये व नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राबाहेर कामकाज करणारा समितीवर कारवाई कार्यवाही करावी असा ठराव सर्वांत सर्व नुमते मंजूर करण्यात आला. या बैठकीला आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ.दशरथ भांडे, प्रल्हाद सोनवणे, संजय कांडेलकर, पंडित कोळी, सुभाष सपकाळे, संजय कोळी, मंगल कांडेलकर, प्रदीप धायडे, सुनीता कोळी, ज्ञानेश्वर तायडे, ज्ञानेश्वर कठोरे यांच्यासह आदिवासी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.