सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे.
ठाकरे आणि शिंदे गटातील शाब्दीक वाद पुन्हा एकदा विकोपाला पोहचले असून यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. सोलापुरात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, राज्यात सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कोठे जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना नक्कीच दाखल केले जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ली मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असे तानाजी सावंत म्हणाले.
तानाजी सावंत म्हणाले की, शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मीच फाऊंडर आहे. २०१९ साली मातोश्रीवर जाऊन मीच अगोदर आव्हान दिले होते. माझ्यावर अन्याय का करण्यात आला, याचे मला उत्तर द्या, असा जाब मी मातोश्रीवर जाऊन विचारला होता. तसेच माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नसाल, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, असेही मी तेव्हा म्हणालो होतो, असे तानाजी सावंत म्हणाले.