जळगाव प्रतिनिधी । आम्ही यापुढे व्यक्ती नव्हे तर पक्षाला प्राधान्य देणार असल्याचे सूचक वक्तव्य करून जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली असून त्यांच्या टिकेचा रोख हा एकनाथराव खडसे यांच्याकडे असल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भुसावळ तालुक्यातील कुर्हे-वराडसीम गटातून निवडून आलेल्या पल्लवी प्रमोद सावकारे या अतिशय अभ्यासू सदस्या असून त्यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये कामाची छाप उमटवली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीही त्यांचे नाव आघाडीवर होते. यानंतर त्यांना सभापतीपद मिळण्याची अपेक्षा होती. तथापि, येथेदेखील डावलण्यात आल्याने त्या नाराज झाल्या आहेत. आम्ही सभागृहात नेहमी बोलत होतो, आज मी, आमचा परिवार हा व्यक्तीनिष्ठ होतो याचे ‘फळ’ आम्हाला मिळाले. आपल्या सभापतीपदासाठी गिरीशभाऊ महाजन, आ. संजय सावकारे, किशोर काळकर आदी नेते अनुकुल होते. तथापि, व्यक्तीनिष्ठ असल्याचा फटका आपल्याला बसला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी सभापतीपदाच्या निवडीनंतर दिली. त्यांच्या टिकेचा रोख हा एकनाथराव खडसे यांच्या दिशेने असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पहा : पल्लवी सावकारे नेमक्या काय म्हणाल्या ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/465882061014514