पुणे प्रतिनिधी । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आपण केजरीवाल यांना दहशतवादी म्हटलोच नाही असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत आणि त्याचे अनेक पुरावे आहेत, असे मी बोललोच नव्हतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर काँग्रेस पक्ष दिल्लीतून लुप्त झालेला दिसत आहे. आता काँग्रेसची ही मते आपकडे वळली का हे माहीत नाही. मात्र त्यामुळे आप आणि भाजपामध्ये थेट लढत झाली. तसेच गोली मारो आणि भारत पाक ही विधाने भोवली, हे शहांचं निरीक्षण बरोबर आहे. पण या पराभवा मागे इतरही कारणे आहेत. खरंतर भाजपा हा शिकणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही या पराभवातून योग्य तो बोध घेऊ.असेही जावडेकर म्हणाले.