अट्टल दुचाकी चोर गजाआड; दोन दुचाकी हस्तगत

LCB news

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात ठिकठिकाणी दुचाकींची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातील दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अफसर हुसेन मन्यार (वय-19) वर्षे रा.मदनीनगर, अडावद असे दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथकाने तीन ते चार दिवस संशयिताच्या गावात मुक्काम ठोकला. संशयित दुचाकी चोरी करत असल्याचे निष्पन्न झाल्यावर पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

चोपडा शहरात चैतन्य हॉस्पिटलचे गेट समोरुन ३१ जानेवारी रोजी भागवत माधव पाटील (वय- ५७) रा. सनपुले यांची एमएच१९/बीडी २९५६ ही मोटारसायकल लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झला होता. तर जळगावात १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळील काकाजी लॉज समोरुन समाधान मुकूंदा भालेराव रा. धामणगाव यांची दुचाकी चोरट्यांनी लांबविली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हेचे पोहेका नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, परेश महाजन, प्रविण हिवराळे, दिपक पाटील यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. अडावद येथे एक तरुण दुचाकीचोरी करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने अडावद गावात सतत 03 ते 04 दिवस मुक्कामी राहुन अफसर हुसेन मन्यार यास ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान त्याच्याकडून दुचाकी चोरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Protected Content