आता जळगाव महापालिकाही नाथाभाऊंच्या अजेंड्यावर ! (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेत अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी माझ्याकडे केल्या आहेत. त्याबद्दल मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे असे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

विशेष करून, नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आलेल्या शहराच्या स्वच्छतेच्या ठेक्यात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू असून, त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आहे. या विषयासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य प्रशांत नाईक यांनी आपल्याला काही कागदपत्रे दिली आहेत. या कागदपत्रांचा अभ्यास सुरू आहे. त्यात काही तथ्य निघाले तर संबंधित अधिकारी तसेच भ्रष्टाचाराला पाठिंबा देणार्‍या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपण स्वत: राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे खडसे यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या वेळेस मी भाजपकडून प्रचारात नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतरही नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसल्याने आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यास सांगितले होते. आताही तीच परिस्थिती असल्याने मी नागरिकांच्या बाजूने आहे, असे खडसे म्हणाले. एकनाथ खडसे हे व्यक्तिगत कामानिमित्त जळगावात आले होते. यावेळी आपल्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांसोबत ते बोलत होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/778117406104686/

Protected Content