आढावा राज्यपालांनी घ्यायचा असतो -चंद्रकात पाटील

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – आम्ही राष्ट्रपती राजवटीची कधी मागणी केलेली नाही. राज्यातील परिस्थितीचा आढावा राज्यपालांनी घ्यायचा असतो,  असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर दिले.

राज्यात पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, असे सांगत राणा दाम्पत्यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आंदोलन मागे घेतले. यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांनी यामध्ये लक्ष द्यावे. तशी राज्यातील परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आ.रवि राणा यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी पाटील यांना राष्ट्रपती राजवटीबाबत विचारले.

आघाडी सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले कि, ‘ महाविकास आघाडीच्या पोटात नेहमीच भीती आहे, राज्यात असे काहीही झाले की, त्यांना राष्ट्रपती राजवट आठवते.  राज्यातील परिस्थितीचा आढावा राज्यपालांनी घ्यायचा असतो, असे पाटील यांनी सांगितले.

भाजपाने काही राष्ट्रपती राजवटीची मागणीही केलेली नाही कि, राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपतीं किंवा पंतप्रधानांना पत्र दिलेले नाही. आ. राणाच काय, सामान्य माणसालादेखील राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्याचा अधिकार असल्याचेही यावेळी पाटील म्हणाले.

Protected Content