Home Cities एरंडोल आडगाव येथे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबविले

आडगाव येथे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबविले

0
296


एरंडोल-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे शेतकऱ्याचे बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून येण्याचे समोर आले आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज सुखदेव महाजन (वय-५०) रा. आडगाव ता. एरंडोल हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ते शेतात गेलेले असताना त्यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातील कपाटातून सोन्याची पोत सोन्याच्या बाह्या, पतक्या यासह लहान बाळांचे कळे असा एकूण ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सायंकाळी उघडकीला आल्यानंतर युवराज महाजन यांनी कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युवराज कोळी करीत आहे.


Protected Content

Play sound