आठ महिन्यानंतर संत गजानन महाराजांचे मंदिर खुले (व्हिडिओ )

शेगाव (जि.बुलडाणा) : अमोल सराफ । कोरोनामुळे आठ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर संतनगरी शेगावमधून पुन्हा जय श्री गजानन माऊली शब्द कानी पडत आहेत. मंदिर उघडल्याने समाधी दर्शनाची भक्तांना ओढ लागली होती

मार्च महिन्यात देशात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर देश लाॅकडाऊन करण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. शेगावातील गजानन महाराज मंदिरही बंद करण्यात आले होते

दरम्यान राज्यात विविध राजकीय पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली १४ नोव्हेंबरला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदिरे उघण्याचा निर्णय घेवून भाविकांना सुखद धक्का दिला.

आज सकाळी शेगाव येथील मंदिर उघडल्यामुळे भाविकांमध्ये उत्साह दिसून आला त्यामुळे पुन्हा ‘गण गण गणात बोते…चा गजर … पुढे चला माऊली…हे शब्द कानी पडली . आठ महिन्यानंतर भाविकांची गजानन महाराजांशी भेट झाली ई पास धारक भाविकांनी शेगावमध्ये नतमस्तक होऊन गजानन महाराज यांच्या चरणी श्रद्धा अर्पण केली

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/372258944109560/

Protected Content