जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – कोरोना संसर्गामुळे गेले वर्ष दीड वर्ष शाळा महाविद्यालये बंद होती, गेल्या तीन-चार महिन्यापासून शाळा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा यापुढे शनिवार आणि रविवार देखील सुरु ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांसह प्राथमिक तसेच माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या घेता येणार नाहीत. उन्हाळी सुट्या रद्द करणारे भारतातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
राज्यात गेल्या दीड दोन वर्षापासून संसर्ग प्रादुर्भाव प्रतिबंधामुळे शाळा बंद होत्या परन्तु ऑनलाईन शिक्षण व प्रसंगी विद्यार्थ्याच्या घरी शिक्षकांकडून गृहभेटी देखील देत मार्गदर्शन करण्यात आले आहे. संसर्ग प्रदुर्भात कमी झाल्यानंतर ऑक्टोबर नंतर शाळा पूर्णवेळ सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु राज्य शासनाच्या वातानुकुलीत कक्षात बसणाऱ्या शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात तसेच परीक्षानंतर देखील या दोन्ही महिन्यात १०० टक्के उपस्थितीसह शाळा सुरु ठेवण्याचे परिपत्रक निर्गमित केले आहे. शनिवार रविवारी शाळा या ऐच्छिकरित्या सुरु ठेवण्याचे निर्देश आहेत.
राज्यात विशेषतः जळगाव जिह्यात मार्च ते मी दरम्यान प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळा सकाळी करण्यात येतात. शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार या शैक्षणिक वर्षात सकाळच्या सत्रात शाळा सुरु करण्याऐवजी १ली ते ९ वी आणि ११वी चे वर्ग शाळा कामकाज पूर्णवेळ चालविण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरवषी विद्यार्थ्यांना एप्रिल पहिल्या आठवड्यात परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्या दिल्या जात होत्या, त्या यावर्षी एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांना शाळा पूर्णवेळ असणार आहे. रविवारी ऐच्छिक सुटी असली तरी उन्हाळ्याची सुटी मात्र मिळणार नसल्याचे दिसून येत आहे.